गांधींनी सर्वसंगपरित्याग केला तो दुसऱ्याची सेवा करण्यासाठी, दुसऱ्यांच्या आनंदासाठी!
संपत्ती, दागदागिने, राजवाड्यांचे वैभव असलेल्या लोकांबरोबर भारतीय लोक आज्ञाधारकपणे वागतात; आणि स्वार्थत्याग व सर्वसंगपरित्याग करणारी माणसे भारतीयांची हृदये जिंकतात. मॅथ्यू अर्नाल्डने लिहून ठेवले आहे, ‘पौर्वात्य माणसे स्फोटापुढे वाकतात आणि त्याकडे सहनशीलतेने आणि खोल तुच्छतेने पाहातात. पण ज्या पौर्वात्य माणसांनी संपत्ती आणि सत्ता कमावली आहे, त्यांच्यापुढेही वाकून ते खोल तुच्छतेने पाहतात.’.......